भरले पापलेट/stuffed pomfret


साहित्य-
१. पापलेट २
२. मिरच्या ४
३. ओले वाटलेले खोबरे १/२ वाटी
४. आले एक छोटा तुकडा
५. लसून पाकळ्या ४
६. लिंबू १
७. हळद पाव चमचा
८. मीठ चवीनुसार
९. रवा १/२ वाटी
१०. अंड १
११. तेल फ्राय करण्यासाठी
१२. गरम मसाला १/२ चमचा

कृती-
मासे साफ करून घेणे. त्याला मधोमध अडवा काप देणे. मिरच्या, ओले खोबरे, आले, लसून, लिंबू, हळद, मीठ वाटून घेणे. पापलेट च्या मध्ये हा मसाला भरून रात्रभर फ्रीज मध्ये झाकून ठेवणे. म्हणजे मसाला चांगला मुरेल. आता एक अंड फोडून त्यात थोडेसे मीठ टाकून त्यात मासा डुबवून रव्यात घोळवणे. आता एका फ्राईंग pan वर २ चमचे तेल टाकून त्यावर मासे अलगद सोडावे. दोन्हीकडून गोल्डन ब्राऊन करून घ्यावे.

टीप-
हे मासे जर लवकर करायचे असतील तर मसाल्यात १-२ तास मुरत ठेवले तरी चालतात.

Comments