मेथंबा/methamba


 
साहित्य-
१. आंबट कैरी १
२. साखर ५ चमचे
३. मोहरी पाव चमचा
४. जिरे पाव चमचा
५. अक्खे धने २ चमचे
६. मेथी दाने १ चमचा
७. तेल ३ चमचे
८. तिखट १ चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. लसूण ३ पाकळ्या
११. पाणी ३ कप

कृती-
कैरीचे साल काढून चिरून तुकडे करावे. धने व मेथी थोडी भाजून पूड करून घ्यावी. लसूण कुटून घ्यावा. एका भांड्यात तेल गरम करून, त्यात मोहरी, जिरे, तिखट, लसूण टाकावा व नंतर कैरी टाकून २ मिनिटाने धने व मेथीची पूड टाकून पाणी टाकावे. व आता सखर, मीठ टाकून झाकण ठेवून मंद gas वर ६-७ मिनिटे होऊ द्यावे. कैरी शिजल्यावर gas बंद करावा.

Comments