चायनीज फ्राईड राइस/ chinese fried rice


साहित्य-
१. शिजवलेला भात 3 वाट्या
२. शिमला मिरची १
३. गाजर अर्धी वाटी
४. फरसबी अर्धी वाटी
५. पातीचा कांदा अर्धी वाटी
६. पत्ता कोबी अर्धी वाटी
७. कांदे २ मोठे
८. लसूण पाकळ्या ६-७
९. आले एक छोटा तुकडा
१०. तेल ३ चमचे
११. मिरच्या ४
१२. मीठ चवीनुसार
१३. अजिनोमोटो पाव चमचा
१४. सोया सॉस 3 चमचे
१५. tomato सॉस २ चमचे
१६. चिली सॉस १ चमचा

कृती-
शिमला मिरची, कोबी, पातीचा कांदा, मिरच्या,कांदा, फरसबी, गाजर मिडीयम आकारात चिरून घ्यावे. लसूण व आले बारीक चिरावे. आता एका कढईत तेल तापवून त्यात मिरच्या, व कांदा टाकून परतवून घ्यावा. आता शिमला मिरची, कोबी, पातीचा कांदा, फरसबी, गाजर, लसूण, आले टाकून मोठ्या gas वर परतावे. आता त्यात सर्व सॉस, अजिनोमोटो, व भात टाकावा. चांगले मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ टाकून परत चांगले ढवळून घ्यावे. व गरम सेर्व्ह करावे.

Comments