मेथीचे गोळे/methi gatte


साहित्य-
१. मेथीची भाजी १/२ किलो
२. कांदा १.
३. tomato १
४. लसूण पाकळ्या ६
५. आले एक छोटा तुकडा
६. जिरे १/२ चमचा
७. मोहरी १/२ चमचा
८. लाल तिखट १ चमचा
९. बेसन ४ चमचे
१०. पाणी ४ कप
११. तेल ४ चमचे
१२. गरम मसाला १/२ चमचा
१३. मिरच्या २
१४. मीठ चवीनुसार

कृती-
मेथीची भाजी धून बारीक चिरून घेणे. आले, लसूण, जिरे वाटून घेणे. त्यातील अर्धे भाजीत टाकणे. तिखट, बेसन, व मीठ घालून चांगले मिक्स करणे. त्याचे घट्ट गोळे बनवणे. गोळे बनत नसल्यास अगदी थोडे पाणी घालणे. आता एका पातेल्यात तेल घेऊन मोहरी तडतडू देणे. आता मिरची व कांदा परतणे. कांदा परतल्यावर लसूण, आल्याची पेस्ट टाकून होऊ देणे. नंतर tomato , गरम मसाला, टाकून पाणी टाकणे. पाण्याला उकळी आल्यावर मीठ, मेथीचे गोळे सोडणे. आता झाकण ठेऊन मंद gas वर १०-१५ मिनिटे भाजी शिजू देणे. गरम गरम भाजी भाकरी बरोबर खाण्यास द्यावी.

Comments