आलू मटर मसाला/ aloo matar masala


साहित्य-
१. बटाटे ४
२. हिरवे वाटणे १ १/२ वाटी
३. कांदे २ मोठे
४. खोब्र्याचे तुकडे पाव वाटी
५. गरम मसाला २ चमचे
६. तिखट चवीनुसार
७. मीठ चवीनुसार
८. कोथिंबीर ३ चमचे
९. तेल ५ चमचे
१०. आले एक छोटा चमचा
११. लसुण पाकळ्या ४
१२. पाणी ४ वाट्या

कृती-
बटाट्याचे तुकडे करून तेलात सोनेरी व कडक होईपर्यंत तळून घ्यावे . ते काढून बाजूला ठेवावे. कांदे चिरून तव्यावर एक चमचा तेल टाकून ते चांगले भाजून काढून घ्यावे. त्याचप्रमाणे खोबरे सुद्धा भाजून घ्यावे. आता कांदे, खोबरे, लसुण व आले मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. एका भांड्यात ५ चमचे तेल घ्यावे. त्यात वाटलेला मसाला टाकून थोड्या वेळ चांगला परतवा. आता त्यात वाटणे, तिखट, गरम मसाला टाकून मंद gas वर झाकण ठेवून २ मिनिटे होऊ द्यावे. आता झाकण काढून त्यात बटाटे, मीठ व पाणी टाकून परत झाकण ठेवून ५ मिनिटे होऊ द्यावे. मग gas बंद करून त्यावर कोथिंबीर पेरावी.

Comments

Post a Comment