चिकन/ chicken franky


साहित्य-
१. बोनलेस चिकन अर्धा पाव 
२. सिमला मिरची १
३. tomato १
४. गाजर ardhe
५. कांदे ४
६. गरम मसाला १ चमचा
७. तिखट २ चमचे
८. चीज ३ ते ४ क्यूब
९. बटर ५-६ चमचे
१०. अंडी २
११. मीठ आवश्यकतेनुसार
१२. हळद २ चमचे
१३. मैदा २ वाट्या
१४. मोहरी पाव चमचा
१५. जिरे पाव चमचा
१६. पत्ता कोबी २ वाट्या
 

कृती-
चिकन ला मीठ व हळद लावून आधी पाण्यात उकळवून शिजवून घ्यावे. नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करावे. कांदे, गाजर, tomato , शिमला मिरची, पत्ता कोबी लंबी पातळ चिरून घ्यावी. एका भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग त्यात थोडा कांदा वगळून बाकीचा कांदा लालसर होऊ द्यावा. मग तिखट, गरम मसाला, चिकन, गाजर, tomato  ,शिमला मिरची टाकून ५ मिनिटे झाकण ठेऊन शिजू द्यावे. सगळ्यात शेवटी मीठ टाकावे व gas बंद करून पत्ता कोबी टाकावी.
मैद्यामध्ये मीठ व पाणी टाकून घट्ट गोळा करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्या. एक एक पोळी दोन्ही बाजूने शेकून घ्यावी.
franky करायच्या वेळेवर एक एक पोळी तव्यावर ठेऊन खालच्या बाजूला बटर सोडून वरच्या बाजूस फोडलेले अंडे ३ चमचे घेऊन त्यावर पसरवावे. मग पोळी अंड्याच्या बाजूनेही शेकून घ्यावी. मग त्यावर आपण केलेले चिकन चे मिश्रण लांबट ठेऊन त्यावर चीज किसून टाकावे व पोळीचा रोल करावा. गरमच सर्व्ह करावे.
टीप-
बोनलेस चिकन नसल्यास साधे चिकन उकडवून त्याचे हातानेच छोटे छोटे पिसेस तोडून घेता येतात.
ह्या franky मध्ये जर चीज टाकायचे नसेल तर आतून व्हाईट सॉस लावावा.

Comments