मैक्रोनी इन व्हाईट सॉस/ macaroni in white sauce


साहित्य-

१. macaroni १०० gm
२. पाणी आवश्यकतेनुसार
३. पत्ता कोबी अर्धी वाटी
४. शिमला मिरची अर्धी वाटी
५. गाजर अर्धी वाटी
६. बटर ३ चमचे
७. चीज १ क्यूब
८. मैदा २ चमचे
९. पांढरी मिरपूड १ चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. कांदा १
१२. tomato १
१३. दुध २ वाट्या
१४. व्हिनेगर १ चमचा

कृती-
प्रथम व्हाईट सॉस तयार करण्याकरिता एका भांड्यात १ चमचा बटर घेऊन त्यात मैदा थोडा भाजून घ्यावा. त्यात दुध, मीठ, मिरपूड घालून चांगल मिक्स करून gas वर ठेवावे. जास्त घट्ट होत असल्यास थोडेसे पाणी टाकावे. उकळी आल्यावर gas बंद करून त्यात व्हिनेगर घालावे. 
macaroni एका पातेल्यात पाणी घेऊन gas वर १० मिनिटे उकळत ठेवावी. मग चाळणीत घेऊन त्यावर थंड पाणी टाकून macaroni हाताने अलगद वेगळी करावी. सर्व भाज्या लंब्या पातळ चिरून घ्याव्या.
एका कढईत बटर घेऊन प्रथम कांदा होऊ द्यावा व नंतर सर्व भाज्या घालून थोड्या शिजू द्याव्या. आता त्यात १ ते १ १/२  कप पाणी व व्हाईट सॉस घालून चांगले मिक्स करावे. उकळी आल्यावर मीठ व macaroni टाकावी. gas बंद केल्यावर चीज किसून टाकावे. व गरम सेर्व्ह करावे. 

Comments