वऱ्हाडी मटन करी/ varhadi mutton curry


साहित्य-
१. मटन १/२ किलो
२. दही ३ चमचे
३. हळद अर्धा चमचा
४. तिखट चवीनुसार
५. गरम मसाला पाव चमचा
६. मीठ चवीनुसार
७. आले १ छोटा तुकडा
८. लसूण पाकळ्या ६-७
९. तेल अर्धी वाटी
१०. मिरे ४
११. लवंगा ३
१२. शहाजिरे अर्धा चमचा
१३. खसखस अर्धा चमचा
१४. सुके खोबरे बारीक चिरून 4 चमचे
१५. कांदे २
१६. तीळ २ चमचे 
१७. शेंगदाणे १ चमचा
१८. तमालपत्र ३
१९. दगडफूल २ चमचे
२०. धने २ चमचे
२१. दालचिनी तुकडे अर्धा चमचा
२२. मसाल्याचे फुल १
२३. जायपत्री अर्धा चमचा
२४. पाणी आवश्यकतेनुसार
२५. मेथी अर्धी वाटी
२६. पालक अर्धी वाटी
 
कृती-
प्रथम मटन धून त्याला हळद, थोडेसे मीठ, दही लावून १-२ तासांकरिता फ्रीज मध्ये मुरण्यास ठेवून द्यावे. तव्यावर एक चमचा तेल टाकून त्यावर कांदा चिरून चांगला खरपूस भाजून घ्यावा. आता त्याच तव्यावर एक एक करून खोबरे, शेंगदाणे, तमालपत्र, धने, दगडफूल, तीळ, खसखस, शहाजिरे भाजून घ्यावे. मटनात १ १/२ ग्लास पाणी, चिरलेला पालक, मेथी घालून कुकर मध्ये शिजत ठेवावे. पाच शिट्या होऊ द्याव्या. व कुकर थंड होण्यास ठेवून द्यावा. आता मिक्सर मध्ये न भाजलेला मसाला- जायपत्री, मसाल्याचे फुल, दालचिनी, लवंगा, मिरे, व भाजलेला मसाला- खोबरे, शेंगदाणे, तमालपत्र, धने, दगडफूल, तीळ, खसखस, शहाजिरे एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. आता त्यात वाटीभर पाणी घालून परत वाटून घ्यावे (मसाला हाताने नीट बारीक झाला की नाही ते पाहावे). आता भाजलेला कांदा, लसूण, व आले वाटीभर पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. हे दोन वाटण वेगळे ठेवावे.
एका भांड्यात तेल तापवून त्यात प्रथम गरम मसाल्याचे वाटण घालून १ मिनिट मिडीयम आचेवर परतावा. आता कांद्याचे वाटण घालून परत १ मिनिट परतून त्यात हळद, तिखट, गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत होऊ द्यावे. शिजलेले मटन टाकून १ मिनिट होऊ द्यावे. आता कुकर मधील उरलेले पाणी टाकून चांगली उकळी आल्यावर मीठ टाकून gas बंद करावा. करी पातळ करायची असल्यास आणखी थोडे पाणी टाकावे. कोथिंबीर पेरून सेर्व्ह करावे.

Comments

  1. First time seeing your web site. Will definetly try this recipe.
    Just want to know, mutton is marinated in curd. So, is it okay to add 1 1/2 glass of water directly to muuton before frying the mutton in oil? Because I feel if water is directly added to yougurt, it can give bitter smell.
    Plz clarify.

    -Anand

    ReplyDelete
    Replies
    1. चिकनला मसाला चांगल्या प्रकारे लागावा याकरिता मुरलेले चिकन आधी फोडणीत टाकावे. नंतर त्यात पाणी टाकावे. जर दह्याची चव लागावी असे वाटत असेल तर करी झाल्यावर शेवटी दही फेटून टाकावे.

      Delete

Post a Comment