मुळ्याचा परोठा/Mulika paratha


साहित्य-
१. मोठे मुळे २ पानांसकट
२. मिरच्या ४-५
३. लसूण पाकळ्या ५-६
४. आले १ छोटा तुकडा
५. butter आवश्यकतेनुसार
६. मीठ आवश्यकतेनुसार
७. कणिक २ वाट्या
८. मैदा १ वाटी

कृती-
कणिक, मैदा, मीठ एकत्र करून घट्ट गोळा भिजवणे. मुळे किसून घेणे. त्याची पाने बारीक चिरून घेणे. मुळ्यान्मधले पाणी पिळून काढून टाकणे. एका कढईत थोडेसे तेल तापत ठेऊन त्यात आले, लसूण, मिरचीची पेस्ट टाकणे. थोडे परतल्यावर किसलेला मुळा, पाने टाकणे व परतून घेणे, जेणेकरून त्यातील सगळ्या पाण्याची वाफ होईल. जास्त शिजू द्यायची गरज नाही. आता हे मिश्रण थंड झाल्यावर कणकेच्या २ पाऱ्या लाटून एका पारीवर ठेवावे. व त्यावर दुसरी पारी ठेऊन त्याचे काठ चांगल्या प्रकारे बंद करून घ्यावे. आता हा परोठा जाडसर लाटावा. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूनी चांगला शिजवून घ्यावा. सर्व्ह करताना वरतून butter टाकावे.

Comments