नागपुरी गोळा भात ( nagpur gola bhaat )



साहित्य - 

१. बासमती तांदूळ दीड वाटी 
२. बेसन १ वाटी 
३. आले, लसूण,मिरची पेस्ट १ चमचा 
४. मीठ चवीनुसार
५. हळद पाव चमचा 
६. तिखट चवीनुसार
७. मोहरी अर्धा चमचा
८. जिरे अर्धा चमचा
९. हिंग अर्धा चमचा
१०. तेल ४ चमचे 
११. काश्मिरी लाल मिरची ३
१२. दही २ चमचे 

कृती - 

बासमती तांदुळ धुवून १ तास पाण्यात भिजवून ठेवावा. बेसन कोरडेच एका भांड्यात खरपूस भाजून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात आले, लसूण, पेस्ट टाकावी. मीठ, तिखट, एक चमचा तेल, दही टाकून एकत्र करावे. व तळहातावर छोटा गोळा घेऊन दाबून त्याचे बोटांच्या साह्याने मुठ्ठे बनवून घ्यावे. जास्त दाबून बनवू नये. आता एका मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग त्यात मिरच्या, हिंग, हळद टाकून तांदूळ निथळून टाकावा. आता त्यात ३ वाटी पाणी, मीठ टाकून उकळी येऊ द्यावी. उकळी आली की गोळे टाकून झाकण ठेऊन मंद गॅसवर २५ मिनिटे शिजू द्यावे. भात शिजल्यावर गरम कढीबरोबर सर्व्ह करावे.

Comments