मावा केक ( mawa cake)



साहित्य - 

१. खवा १ पाव 
२. पिठी साखर १ वाटी 
३. मैदा दीड वाटी 
४. वेलची पावडर अर्धा चमचा
५. बटर अर्धी वाटी
६. बेकिंग पावडर एक चमचा
७. इनो सोड्याचे अर्धे पाकीट 
८. दूध आवश्यतेप्रमाणे
९. बदाम पिस्ते ४-५ सजवण्याकरता 

कृती - 

एका भांड्यात बटर घेऊन त्यात पिठी साखर घेऊन चांगली चमच्याने एकत्र करावी मग त्यात मैदा, वेलचीपूड घालून नीट एकत्र करावे. व आवश्यकतेनुसार दूध घालून मिश्रण नेहमीच्या केकच्या मिश्रणापेक्षा घट्ट ठेवावे. आता बेकिंग पावडर व सोडा घालून परत फेटून घ्यावे. खवा किसून घालावा. चांगले ढवळून घ्यावे. एका भांड्याला तूप लावून त्यात हे मिश्रण ओतावे. व मंद गॅस वर तवा ठेवून त्यावर हे भांडे ठेवावे. वरून झाकण ठेऊन १ ते दीड तास शिजू द्यावे. मग थंड करून काढून घ्यावा. व बदाम पिस्ते चे काप त्यावर सजवावे. 

Comments