मँगो चॉकलेट लोफ केक ( mango chocolate loaf cake)



साहित्य - 

१. आंब्याचा रस सव्वा कप 
२. साखर पाऊण कप
३. व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा
४. दूध आवश्यकतेनुसार 
५. कुकींग चॉकलेट पाव वाटी
६. मैदा दीड कप 
७. बेकिंग पावडर एक चमचा
८. ईनो सोडा १ चमचा 
९. मीठ पाव छोटा चमचा
१०. तेल पाव कप
११. व्हिनेगर एक चमचा

कृती - 

आंब्याच्या रसात साखर टाकून विरघळेपर्यंत ढवळून घ्यावी. आता त्यात व्हिनेगर, ३ चमचे दूध, व्हॅनिला इसेन्स, तेल टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. एका भांड्यात मैदा, मीठ, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करावा. त्यात आंब्याचे मिश्रण टाकून चांगले ढवळून घ्यावे. आता एका वाटीत चॉकलेट व ३ चमचे दूध टाकून मायक्रोवेव्ह मध्ये १५ सेकंद गरम करून चॉकलेट वितळवून घ्यावे. चांगले एकत्र करावे. आता ४ चमचे केकचे तयार मिश्रण ह्या चॉकलेटच्या मिश्रणात कालवून घ्यावे. आता एका लोफ च्या भांड्याला तूप लावून घ्यावे. त्यात २ चमचे मैदा टाकून सगळीकडे पसरवून उरलेला झटकून काढून टाकावा. आता ह्या भांड्यात आधी आंब्याच्या रसाचे मिश्रण टाकावे. सगळीकडे पसरवून घ्यावे. आता त्यावर चॉकलेट चे केक चे मिश्रण पसरवून टाकावे. प्रीहिटेड ओव्हन मध्ये १८० वर ५० ते ६० मिनिटांकरता शिजवून घ्यावे. शिजल्यावर स्लाइस कापून सर्व्ह करावे.   

Comments