चुरोज आणि चॉकलेट सॉस ( churros with chocolate sauce )



साहित्य - 

१.  मैदा एक कप
२. ब्राऊन शुगर ३ मोठे चमचे 
३. व्हॅनिला इसेन्स ४-५ थेंब 
४. मीठ चिमूटभर 
५. अंडी २
६. बटर अर्धी वाटी 
७. कुकिंग चॉकलेट अर्धी वाटी 
८. दूध अर्धी वाटी
९. दालचिनी पावडर एक छोटा चमचा 
१०. तेल तळण्यासाठी

कृती - 

एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवावे. त्यात बटर, मीठ, २ चमचे ब्राऊन शुगर, व्हॅनिला इसेन्स टाकून उकळी येऊ द्यावी. उकळी आली की मैदा टाकून लगेच चांगले ढवळून एकत्र करावे व गॅस बंद करावा. एका भांड्यात काढून त्यात एक अंड फोडून टाकावे. चमच्याने चांगले मिक्स करून परत एक अंड टाकून नीट एकत्र करावे. चिकट गोळा तयार होईल. आता स्टार नोजल असलेल्या पायपिंग बॅग मध्ये हे मिश्रण ओतावे. व गरम तेलात उभ्या उभ्या स्ट्रिप सोडाव्या. ब्राऊन रंग यईपर्यंत तळून काढून घ्यावे. एका प्लेट मध्ये एक चमचा ब्राऊन शुगर व दालचिनी पावडर एकत्र करावी. व सर्व चूरोजना सर्व बाजूंनी नीट लावून घ्यावे. एका वाटीत चॉकलेट व दूध गरम करून एकत्र करून चूरोज बरोबर सर्व्ह करावे. 

Comments