गव्हाच्या पिठाची गार्लिक ब्रेड (gluten free garlic bread)



साहित्य - 
१. लसूण पाकळ्या १० 
२. गव्हाचे पीठ ४ वाटी 
३. ड्राय ऍक्टीव्ह यीस्ट १ चमचा
४. मीठ चवीनुसार
५. पिझ्झा सिझनींग ३ चमचे 
६. चिली फ्लेक्स २ चमचे 
७. कोथिंबीर अर्धी वाटी 
८. बटर ४ चमचे 
९. तेल २ चमचे 
१०. चीज १ वाटी 
११. स्वीट कॉर्न अर्धी वाटी 
१२. साखर एक चमचा

कृती -
अर्धा कप कोमट पाण्यात साखर मिक्स करून त्यात यीस्ट टाकून नीट ढवळून घ्यावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. १० मिनिटानंतर यीस्ट पाण्यात फुगलेले दिसेल. (जर यीस्ट फुगलेले दिसले नाही तर ते वापरू नये. कारण ते वापरल्यास ब्रेड फुगत नाही) एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ घेऊन त्यात एक चमचा चिली फ्लेक्स, एक चमचा पिझ्झा सिझनिंग टाकून एकत्र करावे. आता त्यात यीस्ट चे पाणी टाकून एकत्र करावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळा घट्ट भिजवा. ३-४ मिनिटे मळून घ्यावा. सैल होऊ देऊ नये. आता झाकण ठेवून २ तास ठेवून द्यावा. २ तासानंतर फुललेला दिसेल. आता परत चांगला मळून घ्यावा. एका वाटीत बटर रूम टेंपरेचर वर आणून मग त्यात लसूण ठेचून टाकावा. कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. थोडे मीठ टाकून मिश्रण एकत्र करावे. आता एका पोळीपेक्षा मोठा गोळा घेऊन त्याची जाड पोळी लाटावी. त्याच्या अर्ध्या भागात बटरचे एक चमचा मिश्रण पसरवावे. त्यावर स्वीट कॉर्न, किसलेले चीज, थोडे पिझ्झा सिझनींग, चिली फ्लेक्स टाकून अर्धी पोळी बंद करावी. आता वरतून परत थोडे बटरचे मिश्रण, पिझ्झा सिझनींग, चिली फ्लेक्स लावावे. त्यावर चाकूने काप मारावे. पूर्ण आतपर्यंत मारू नये. आता एका बेकिंग पात्राला तेल लावून त्यावर ही ब्रेड ठेवावी. आता प्रीहिटेड ओवन मध्ये २० मिनिटे बेक करावे. किंवा वरतून थोडा कलर बदलेपर्यंत होऊ द्यावे. 

Comments