दाल पकवान ( dal pakwan)



साहित्य - 

१. मैदा एक वाटी
२. गव्हाचे पीठ एक वाटी 
३. रवा पाव वाटी
४. तिखट चवीनुसार
५. मीठ चवीप्रमाणे
६. मिरपूड पाव चमचा
७. तीळ 2 चमचे 
८.  हरबरा डाळ २ वाट्या
९. तूप २ चमचे 
१०. टोमॅटो १
११. कांदे २ 
१२. आले लसूण पेस्ट १ चमचा 
१३. गरम मसाला १ चमचा 
१४. धणेपूड १ चमचा 
१५. कसुरी मेथी अर्धा चमचा 
१६. आमचूर पावडर अर्धा चमचा 
१७. तेल आवश्यतेनुसार 
१८. जिरे अर्धा चमचा
१९. मोहरी अर्धा चमचा
२०. हळद पाव चमचा
२१. कोथिंबीर एक वाटी

कृती - 
 
एका भांड्यात रवा, कणीक, मैदा, तीळ, मिरपूड, मीठ, अर्धा चमचा तिखट व तूप एकत्र मिक्स करून घ्यावे. त्यात थोडे पाणी टाकून गोळा घट्ट भिजवून झाकून ठेवावा. हरबरा डाळ धुवून भरपूर पाण्यात कुकर मध्ये 3 शिट्टी करून शिजवून घ्यावी. आता एका भांड्यात ३ चमचे तेल गरम करून घ्यावे. त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. आता बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यावा. आले लसूण पेस्ट टाकून होऊ द्यावे. १ मिनिट झाला की टोमॅटो, तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, धणेपूड, हळद, आमचूर पावडर टाकून ३ मिनिटे परतावे. आता शिजलेली डाळ व आवश्यतेनुसार पाणी टाकून ५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर मीठ टाकून गॅस बंद करावा. कोथिंबीर पेरावी. 
            आता एका कढईत तेल तापवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून अगदी पातळ अश्या पुऱ्या लाटाव्या. त्याला काट्याच्या चामच्या ने सगळीकडे टोचे मारून घ्यावे. जेणेकरून पुरी फुगणार नाही. आता ह्या पुऱ्या लालसर दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. सर्व्ह करताना डाळीवर चिरलेला बारीक कांदा व कोथिंबीर पेरावी. 

Comments