जॅपनीज सुफले पॅनकेक ( Japanese souffle pancakes )



साहित्य - 

१. मैदा अर्धी वाटी
२. गव्हाचे पीठ १ वाटी
३. पिठी साखर वरून सजवण्याकरीता 
४. बटरस्कॉच सिरप सजवण्याकरीता
५. ब्राऊन शुगर पाव वाटी
६. बटर आवश्यकतेनुसार
७. अंडी २ 
८. व्हॅनिला इसेन्स ४-५ थेंब 
९. दूध एक वाटी 
१०. बेकिंग पावडर अर्धा चमचा 

कृती - 

एका भांड्यात अंड्याचे बलक वेगळे काढून त्यात अर्धी वाटी दूध टाकावे. व व्हॅनिला इसेन्स टाकून एकत्र करावे. एका चाळणीत गव्हाचे पीठ, मैदा, बेकिंग पावडर एकत्र चाळून त्यात टाकावे. चांगले मिक्स करून आवश्यकतेनुसार दूध टाकून मिश्रण थोडे पातळसर करावे. आता अंड्याचा पांढरा भाग एका भांड्यात घेऊन चांगला फेटावा. त्याचा रंग बदलला व फेस आला की ब्राऊन शुगर टाकून भरपूर फेटावे. मिश्रण चांगले फुगायला हवे. आता हे मिश्रण थोडे थोडे करत पिठाच्या मिश्रणात टाकून कालवा. एक नॉनस्टिक पात्र गरम करून थोडे बटर लावून मिश्रण अलगद गोलाकार टाकावे. व पात्रात बाजूला एक चमचा पाणी टाकून झाकण ठेऊन मंद गॅसवर २-३ मिनिटे होऊ द्यावे. मग झाकण काढून पालथे करून शिजवून घ्यावे. आता गरम गरम सर्व्ह करावे. त्यावर पिठीसाखर, बटर व सिरप ने सजवावे. ( कुठलेही सिरप वापरले तर चालेल. नसेल तर मध वापरावे).

Comments