चिंचेचा रस्सम / tamarind rasam




साहित्य –

१. चिंचेचा कोळ अर्धी वाटी
२. धने १ चमचा
३. अर्धा चमचा मिरे
४. कढीपत्त्याची पाने १०
५. सुक्या लाल मिरच्या ४
६. तूरडाळीचे पाणी २ वाटी
७. कोथिंबीर १ वाटी
८. मीठ चवीनुसार
९. तेल २ चमचे
१०. मोहरी पाव चमचा
११. जिरे पाव चमचा
१२. हळद पाव चमचा 
१३. लसूण पाकळ्या ५ 

कृती –

एका खलबत्त्यात मिरे, धने, ५ कढीपत्ते, २ सुक्या मिरच्या कुटून घेणे. एका भांड्यात हा कुटलेला मसाला टाकून थोडा भाजावा. त्यात तूरडाळीचे पाणी, चिंचेचा कोळ, मीठ, अर्धी वाटी कोथिंबीर टाकून अजून पातळ करायचे असल्यास आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. ५ मिनिटे झाकण ठेऊन उकळू द्यावे. मग गाळून घ्यावे. एका कढल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. आता उरलेला कढीपत्ता, हळद, २ सुक्या मिरच्या, कुटलेला लसूण टाकून gas बंद करावा. ही फोडणी रस्सम गरम असतांना त्यात टाकावी. उरलेली कोथिंबीर टाकून बॉईल्ड राईस बरोबर रस्सम सर्व्ह करावे.

Comments