बॉन्ग चींगरी मलाईकरी (कोळंबी करी बेंगाली स्टाईल) / bong chingri malaikari (prawns curry in bengali style)




साहित्य –

१. कोळंबी मिडीयम साईझ १५
२. २ वाटी खवलेला नारळ
३. मिरच्या ३
४. २ चमचे मोहरीची पेस्ट
५. कांदा १
६. हळद १ चमचा
७. तिखट आवश्यकतेनुसार
८. धणेपूड २ चमचे
९. आले पेस्ट १ चमचा
१०. मोहरीचे तेल ३ चमचे
११. जिरे अर्धा चमचा
१२. तमालपत्र २
१३. वेलची २
१४. लवंग ४
१५. साखर अर्धा चमचा
१६. मीठ चवीनुसार 

कृती –

कोळंबी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यातील पाणी निथळून काढून टाकावे. त्यात थोडे मीठ, हळद टाकून एकत्र करून १ तास मुरण्यास ठेवावे. मिक्सरच्या भांड्यात खवलेला नारळ, मोहरीची पेस्ट, धणेपूड, मिरच्या टाकून चांगले बारीक करणे. आवश्यकता वाटल्यात थोडे पाणी टाकणे. एका भांड्यात तेल तापवून जिरे, तमालपत्र, लवंग, वेलची (थोडी फोडून) टाकावी. चिरलेला कांदा टाकून ५ मिनिटे परतवून घ्यावा. आले पेस्ट टाकावी. नारळाची पेस्ट व कोळंबी टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्यात मीठ, साखर टाकून झाकण ठेऊन ७-८ मिनिटे शिजू द्यावे. कोळंबी शिजल्यास गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावे.

Comments