अम्रितसरी छोले / amritsari chhole




साहित्य –

१. छोले २ वाटी
२. कांदे २
३. टमाटा १
४. दालचिनी ३ छोटे तुकडे
५. तमालपत्र २
६. तिखट आवश्यकतेनुसार
७. जिरेपूड अर्धा चमचा
८. धणेपूड १ चमचा
९. तेल ४ चमचे
१०. कसुरी मेथी १ चमचा
११. छोले मसाला ३ चमचे
१२. चिंचेचा कोळ पाव वाटी
१३. मीठ आवश्यकतेनुसार
१४. चहा पावडर २ चमचे 
१५. सोडा पाव चमचा
१६. लसूण पाकळ्या ७
१७. आले एक छोटा तुकडा
१८. कोथिंबीर अर्धी वाटी
१९. बटाटा १ 

कृती –

छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवणे. सकाळी कुकरच्या एका भांड्यात छोले, सोडा, व शिजवलेल्या चहाचे ३ कप पाणी टाकणे. दुसऱ्या भांड्यात बटाटा ठेऊन कुकरच्या ५-६ शिट्या करून छोले चांगले शिजवून घेणे. एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, टमाटा, लसूण, आले टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेणे. एका भांड्यात तेल तापवून त्यात दालचिनी, तमालपत्र व वरील पेस्ट टाकून १० मिनिटे मिडीयम gas वर शिजवणे. आता त्यात तिखट, जिरेपूड, धणेपूड, कसुरी मेथी, छोले मसाला टाकून ३ मिनिटे होऊ देणे. तेल सुटल्यावर छोले व त्यातील पाणी, चिंचेचा कोळ, बटाटा थोडा कुस्करून टाकावा. मीठ टाकावे. ३ मिनिटे शिजू द्यावे. gas बंद करून वरून कोथिंबीर पेरावी. 

Comments