टमाट्याचे लोणचे / tomato pickle




साहित्य –

१. टमाटे ५
२. मोहरीचे तेल ७ चमचे
३. चिंचेचा कोळ १ वाटी
४. मोहरी अर्धा चमचा
५. हळद अर्धा चमचा
६. तिखट अर्धा चमचा
९. लाल सुक्या मिरच्या ५
१०. लसूण पाकळ्या ८
११. मेथीदाण्याची पूड दीड चमचा
१२. मीठ चवीनुसार 

कृती –

टमाटे चिरून मिक्सर मध्ये पेस्ट करून घेणे. एका भांड्यात एक चमचा तेल टाकून त्यात ती पेस्ट टाकून १० मिनिटे आटवणे. आता त्यात चिंचेचा कोळ, हळद, तिखट, मेथीपूड, मीठ घालून परत आटवणे. चांगले घट्ट झाल्यावर gas बंद करणे. एका कढल्यात उरलेले ६ चमचे तेल तापवून त्यात मोहरी तडतडू देणे. आता त्यात लाल मिरच्या व लसूण पाकळ्या टाकून त्या थोड्या तळून घेणे. ही फोडणी वरील मिश्रणात टाकून कालवणे.

Comments