पेपर गार्लिक चिकन / pepper garlic chicken




साहित्य –

१. चिकनचे तुकडे अर्धा किलो
२. दही अर्धी वाटी
३. हळद १ चमचा
४. तिखट चवीनुसार
५. धणेपूड २ चमचे
६. जिरेपूड १ चमचा
७. कांदे ४
८. तमालपत्र २
९. लसणाची पात १ वाटी
१०. मिरेपूड २ चमचे
११. मीठ चवीनुसार
१२. तिळाचे तेल ५ चमचे
१३. कोथिंबीर अर्धी वाटी
१४. आले लसूण पेस्ट २ चमचे 

कृती –

प्रथम चिकन स्वच्छ धुवून घेणे. त्यात थोडे मीठ, अर्धा चमचा हळद व दही टाकून कालवून एक तास मुरण्यास ठेवणे. एका भांड्यात तेल तापवून त्यात तमालपत्र टाकून बारीक चिरलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतावा. आता त्यात आले लसूण पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, मिरेपूड, उरलेली हळद, तिखट, लसणाची पात टाकून २ मिनिटे परतावे. आता चिकन टाकून झाकण ठेवून ५ मिनिटे बारीक gas वर शिजू द्यावे. झाकण काढून आवश्यकतेनुसार पाणी टाकून चिकन शिजेपर्यंत मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजू द्यावे. चिकन शिजल्यावर कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.

Comments