स्प्राऊटेड मूग विथ स्पिनच डोसा / sprouted moong with spinach dosa




साहित्य –

१. मोड आलेले मुग २ वाटी
२. तांदूळ पाऊण वाटी
३. आले एक छोटा तुकडा
४. जिरे अर्धा चमचा
५. मीठ चवीनुसार
६. मिरच्या ४
७. तेल आवश्यकतेनुसार
८. पालक ७-८ पाने
९. कोथिंबीर अर्धी वाटी 

कृती –

तांदूळ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी मोड आलेले मुग, तांदूळ, आले, मिरच्या, पालक, कोथिंबीर मिक्सर मधून चांगले बारीक करून घ्यावे. एका भांड्यात काढून आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिश्रण पातळसर बनवावे. आता त्यात मीठ व जिरे टाकावे. एका नॉनस्टिक तव्यावर तेल पसरवून पाणी शिंपडून डोसा पातळ पसरवावा. थोडा ब्राऊन होत आल्यावर काढून गरम गरम चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

Comments