स्टीम्ड व्हेजीज वीथ सॉसेजेस / steamed veggies with sausages




साहित्य –

१. ब्रोकोली एक मोठे फुल
२. मशरूम्स १०
३. बेबीकॉर्न १०
४. चिकन सॉसेजेस ३
५. उकडलेली अंडी ४
६. ऑलीव्ह ऑईल ४ चमचे
७. मीठ चवीनुसार
८. गाजर एक
९. सलाड सिझनिंग २ चमचे
१०. कोथिंबीर पाव वाटी
११. स्प्राऊटेड मुग अर्धी वाटी 

कृती –

ब्रोकोली, बेबीकॉर्न, गाजरचे मोठे मोठे तुकडे करून वाफेवर १० मिनिटे शिजवून घ्यावे. एका कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात चिरलेला मशरूम परतून घ्यावा. त्यातील पूर्ण पाणी आटू द्यावे. मग स्प्राऊटेड मुग, सॉसेजचे स्लाईसेस करून त्यातच अजून २ मिनिटे शिजवून घ्यावे. gas बंद करावा. वाफवलेल्या भाज्या, परतलेले मशरूम्स, मुग व सॉसेजेस एकत्र करावे. उकडलेल्या अंड्यांचे चाकूने मोठे मोठे तुकडे करून त्यात कोथिंबीर, मीठ, २ चमचे ऑईल, सलाड सिझनिंग टाकून एकत्र करावे व सर्व्ह करावे.    

Comments