ब्रेड रोल / bread roll




साहित्य –

१. ब्रेडचे स्लाईसेस ७-८
२. बटाटे २
३. मटार अर्धी वाटी
४. कोथिंबीर अर्धी वाटी
५. आल्याची पेस्ट १ चमचा
६. हळद पाव चमचा
७. मिरच्या ३
८. तेल तळण्यासाठी
९. मोहरी पाव चमचा
१०. जिरे पाव चमचा
११. मीठ चवीनुसार 

कृती –

बटाटे उकडून कुस्करून घ्यावे. एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग त्यात चिरलेल्या मिरच्या, आले पेस्ट, मटार, हळद टाकून कुस्करलेले बटाटे व मीठ टाकून २ मिनिटे होऊ द्यावे. मग gas बंद करून कोथिंबीर टाकून एकत्र करावे. ब्रेडचे काठ कापून घ्यावे. एक स्लाईस घेऊन पाण्यात बुडवून लगेच काढून घ्यावा. स्लाईस हातावर ठेऊन दुसऱ्या हाताने दाबून पाणी काढून घ्यावे. त्यात एक चमचा बटाट्याचे मिश्रण भरावे. व ब्रेड गुंडाळून बंद करावा. दोन्ही हातांनी थोडे थोडे दाबून लांबट आकार द्यावा. अश्याप्रकारे सर्व रोल तयार करून गरम तेलात खरपूस ब्राऊन तळून घ्यावे. गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करावे.

Comments