भरली सिमला मिरची(रस्याची)/stuffed capsicum(with gravy)
साहित्य-
१. सिमला मिरची ४-५ छोट्या
२. बटाटा १
३. कांदा १
४. tomato १
५. लसूण पाकळ्या ४
६. आले १ छोटा तुकडा
७. गरम मसाला १ छोटा चमचा
८. कोथिंबीर ४ चमचे
९. हळद पाव चमचा
१०. तिखट १ चमचा
११. मिरच्या २
१२. साखर पाव चमचा
१३. मीठ चवीनुसार
१४. तेल पाव वाटी
१५. जिरे पाव चमचा
१६. मोहरी पाव चमचा
१७. १ १/२ कप पाणी
कृती-
बटाटा उकडून कुस्करून घ्यावा. कांदा, अर्धी कोथिंबीर, tomato बारीक चिरून त्यात घालावे. आले, लसूण,मिरची ची पेस्ट करून त्यात टाकावी. साखर, हळद व चवीनुसार मीठ टाकून मिश्रण चांगले एकत्र करावे. सिमला मिरच्या धून देठाकडील बाजूने चाकू घालून आतील भाग व बिया काढून टाकाव्या. आता हे मिश्रण एका एका मिरचीत भरावे. एका पसरट भांड्यात तेल तापवून त्यात अलगद सर्व सिमला मिरच्या ठेऊन मंद gas वर झाकण ठेवून दोन्ही कडून वाफवून घ्याव्या. व बाजूला ठेवाव्या. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हळद, तिखट, उरलेले मिश्रण, गरम मसाला व पाणी टाकून उकळी येऊ द्यावी. gas बंद करून टाकावा. एका सेर्व्हिंग प्लेट मध्ये सर्व मिरच्या ठेऊन त्यावर हा मसाला व कोथिंबीर घालून सजवावे.
Comments
Post a Comment