चिकन लॉलीपॉप/chicken lolipop
साहित्य-
१. ४ चिकन लेग
२. अंड १
३. व्हिनेगर १ चमचा
४. मैदा ३ चमचे
५. cornflour ४ चमचे
६. मीठ चवीनुसार
७. खायचा लाल रंग
८. तिखट चवीनुसार
९. आले छोटा तुकडा
१०. लसूण ३-४ पाकळ्या
११. गरम मसाला १ चमचा
१२. तळण्यासाठी तेल
कृती-
चिकन लेग ला चिरा पाडून घ्यावे. वरील सर्व साहित्य एकत्र करून चिकन ला व्यवस्थित लावून घ्यावे. व फ्रीज मध्ये १-२ तास मुरायला ठेवावे. नंतर एका कढईत तेल चांगले तापू द्यावे. मग त्यात चिकन लेग सोडून तळून घ्यावे. गरम गरम खायला द्यावे.
Comments
Post a Comment