दाल मखनी /dal makhani
साहित्य-
१. उडीद डाळ सालांसकट १ वाटी
२. राजमा १ वाटी
३. मिरच्या ५
४. कांदे २
५. tomato १
६. बटर पाव वाटी
७. मलई पाव वाटी
८. दुध १ वाटी
९. लसूण पाकळ्या ४
१०. आले एक छोटा तुकडा
११. पाणी आवश्यकतेनुसार
१२. मीठ आवश्यकतेनुसार
१३. तिखट १ चमचा
१४. हळद पाव चमचा
१५. मोहरी पाव चमचा
१६. जिरे पाव चमचा
कृती-
राजमा व उडीद ७ तास भिजत ठेवावेत. मग कुकर मध्ये चांगले शिजवून घ्यावे. कांदे, tomato व मिरच्या चिरून घ्याव्या. लसूण, आले ठेचून घ्यावे. एका पातेल्यात बटर गरम करून त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. आता मिरच्या, कांदा थोडा होऊ द्यावा. नंतर लसूण आल्याची पेस्ट व tomato होऊ द्यावे. आता तिखट, हळद टाकून शिजलेली डाळ, पाणी व मीठ टाकून उकळी येऊ द्यावी. गस बंद करून दुध व मलई टाकून मिक्स करून घ्यावे.
Comments
Post a Comment