आंब्याचा शेक/ mango shake
साहित्य-
१. हापूस आंबा १ मोठा
२. साखर पाव वाटी
३. दुध १/२ लिटर
४. बर्फाचे तुकडे ५
५. केशर सजावटीकरिता
कृती-
आंब्याचे साल काढून छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये वाटून रस करून घ्यावा. आता त्यात साखर, दुध, बर्फाचे तुकडे घालून परत मिक्सर मध्ये चांगले फिरवून घ्यावे. ग्लास मध्ये काढून केशर टाकून सेर्व्ह करावे.
टीप-
आवश्यकता वाटल्यास ह्या शेक मध्ये mango इसेन्स व खायचा पिवळा रंग टाकू शकता.
Comments
Post a Comment