चायनीज इडली/ chinese idli


साहित्य-
१. १० इडल्या
२. tomato सॉस ६ चमचे
३. सोया सॉस २ चमचे
४. अजिनोमोटो पाव चमचा
५. शिमला मिरची लंबी बारीक चिरलेली १ वाटी
६. पत्ता कोबी लंबी बारीक चिरलेली १ वाटी
७. कांदे लंबे बारीक चिरून १ वाटी
८. तिखट चवीनुसार
९. मीठ चवीनुसार
१० tomato लंबे चिरलेले १ वाटी
११. तेल ५ चमचे
१२. पातीचा कांदा अर्धी वाटी
१३. मोहरी पाव चमचा
१४. जिरे पाव चमचा
१५. गाजर लंबे बारीक चिरून पाव वाटी

कृती-
इडल्यांचे छोटे छोटे तुकडे कापून घेणे. एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिरे तडतडू देणे. आता त्यात कांदा होऊ देणे. कांदा झाल्यावर त्यात शिमला मिरची, गाजर, अजिनोमोटो, तिखट, tomato टाकणे. थोडेसे परतून मग इडली, पत्ता कोबी, सोया सॉस, tomato सॉस, मीठ, पातीचा कांदा टाकून चांगले मिक्स करून घेणे. व लगेच काढून गरम गरम सेर्व्ह करणे.
टीप-
हा पदार्थ उरलेल्या इडल्यांचाही करता येतो.  झटपट व खायला टेस्टी असल्याने लहान मुलांना डब्यात दिल्यास ते आवडीने खातात.

Comments