अंडा ब्रेड पकोडा/egg bread pakoda


साहित्य-
१. अंडी २
२. दुध २ चमचे
३. बेसन १ चमचा
४. ब्रेड चे स्लाईस ३-४
५. कांदा १
६. tomato १
७. कोथिंबीर २ चमचे
८. मिरच्या ३
९. हळद पाव छोटा चमचा
१०. भाजाण्याकरिता तेल

कृती-
प्रथम अंडी फेटून घेणे. त्यात दुध, बेसन, हळद टाकणे. कांदा, tomato , कोथिंबीर, मिरच्या बारीक चिरून त्यात टाकणे. तवा gas वर तापत ठेवून एक चमचा तेल सोडणे. आता एक एक ब्रेड मिश्रणात बुडवून लगेच काढून  अलगद तव्यावर ठेवणे. ब्रेड तव्यावर टाकल्यावर मिश्रणातील कांदा, tomato , मिरच्या त्यावर पसरवणे.  बारीक gas वर दोन्ही साईडने होऊ देणे. व सॉस बरोबर खायला देणे. 

Comments