आलू ब्रेड पकोडा/ aloo bread pakoda
साहित्य-
१. बटाटे ३
२. मिरच्या ६
३. लसूण पाकळ्या ६
४. आले एक छोटा तुकडा
५. तेल तळायला
६. बेसन २ वाट्या
७. सोडा २ चिमुट
८. ब्रेड चे स्लाइस ४-५
९. मीठ चवीपुरते
१०. तिखट १ चमचा
११. कोथिंबीर पाव वाटी
१२. बडीशेप २ चमचे
१३. हळद पाव चमचा
कृती-
बटाटे उकडून कुस्करून घेणे. लसूण, आले, मिरचीची पेस्ट करून त्यात टाकणे. बडीशेप, मीठ, कोथिंबीर व थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेणे. एका भांड्यात बेसन, तिखट, मीठ व पाणी टाकून पातळसर करून घेणे. एका ब्रेड च्या स्लाइस चे चार याप्रमाणे सगळ्या ब्रेड चौकोनी कापून घेणे. आता त्यातील एका तुकड्यावर बटाट्याचे मिश्रण ठेऊन दुसरा ब्रेड चा तुकडा त्यावर ठेऊन थोडा दाब द्यावा. अश्याप्रकारे सर्व ब्रेड ला मिश्रण लावून घ्यावे. आता बेसनामध्ये सोडा टाकून एक एक वडा चारही बाजूने व्यवस्थित घोळवून गरम झालेल्या तेलात तळून घ्यावा.
टीप-
बटाट्याच्या मिश्रणात कांदा टाकायचा असल्यास २ कांदे कापून एक चमचा तेलात थोडा परतून त्या मिश्रणात टाकून मिस्क करून घेणे.
Comments
Post a Comment