अंडा/egg sandwich
साहित्य-
१. अंडी ४
२. काकडी १
३. tomato २
४. ओले नारळ अर्धे खवून
५. मिरच्या ७-८
६. लिंबू १
७. साखर २ चमचे
८. मीठ चवीनुसार
९. गव्हाची ब्रेड (ब्राऊन ब्रेड) १ पाकीट
१०. बटर आवश्यकतेनुसार
११. कोथिंबीर अर्धी वाटी
कृती-
नारळाची चटणी करण्याकरिता खवलेले नारळ, मिरच्या, कोथिंबीर, लिंबू चा रस, साखर, मीठ, वाटून घ्यावे. अंडी उकडवून त्याच्या गोल चकत्या कापाव्या. याचप्रमाणे tomato च्या , व काकडी सोलून त्याच्या पातळ चकत्या कापाव्या. आता एका ब्रेड च्या स्लाईसला चटणी लावून त्यावर काकडी, tomato , व अंड्याच्या चकत्या ठेवाव्या. दुसऱ्या ब्रेड च्या स्लाईस ला सॉस लावून त्यावर ठेवावा. sandwich च्या टोस्टर ला बटर लावून sandwich त्यात ठेवावे. व दोन्ही साईड ने खरपूस भाजून, मधून कट करून सेर्व्ह करणे.
Comments
Post a Comment