बिट्टी/ bitti
साहित्य-
१. जाड दळलेली कणिक ४ वाट्या
२. ओवा २ चमचे
३. जिरे २ चमचे
४. तेल तळण्यापुरते
५. मीठ चवीनुसार
६. पाणी कणिक भिजवण्यापुरते
कृती-
कणकेमध्ये ओवा, जिरे, मीठ घालावे. व पाणी कमी वापरून घट्ट गोळा करून घ्यावा. आता ७-8 साईज च्या पुऱ्या लाटून घ्याव्या. सर्वात छोटी पुरी लिंबाएवढ्या आकाराची व सर्वात मोठी पुरी तळहाताएवढ्या आकाराची असावी. त्यातील छोटी पुरी घेऊन त्याला तेल लावून घडी करावी. व त्यापेक्षा मोठ्या पुरीला तेल लावून त्यात पुर्णासारखी भरून ती मोठी पुरी बंद करून घ्यावी. असे करत करत सर्व पुऱ्या एकात एक भरून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. अश्याप्रकारे सर्व कणकेचे गोळे करून घ्यावे. एक मोठे पातेले gas वर ठेऊन त्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी. चाळणीला तेल लावून त्यावर सर्व बिट्ट्या १५ मिनिटांकरिता उकड्ण्यास ठेवाव्या. व वरून झाकण ठेवावे. आता झाकण काढून बिट्ट्या पालथ्या करून परत १५ मिनिटांकरिता ठेवाव्या. मग काढून थंड झाल्यावर एका बिट्टीचे ४ याप्रमाणे काप करून घ्यावे. व तेलात खरपूस तळुन घ्यावे.
टीप-
ह्या बिट्ट्या वांग्याची मसालेदार भाजी व तुरीच्या वरणाबरोबर खातात.
बिट्ट्या करताना पाणी जर जास्त वापरले व कणिक जर सैल झाली तर बिट्ट्याना आतून लेयर्स येणार नाहीत.
बिट्ट्या करताना मीठ नेहमीपेक्षा जास्त घालावे. म्हणजे नुसत्या जरी खाल्ल्या तरी चविष्ट लागतात.
Comments
Post a Comment