पातीच्या कांद्याची कोरडी भाजी ( spring onion sabji)

साहित्य - 

१. पातीचे कांदे १० 

२. बेसन अर्धी वाटी

३. आले लसूण पेस्ट 1 चमचा 

४. तिखट चवीनुसार 

५. मीठ चवीनुसार 

६. तेल ३ चमचे 

७. धणेपूड १ चमचा

८. मोहरी अर्धा चमचा

९. जिरे अर्धा चमचा

१०. हळद पाव चमचा


कृती - 

प्रथम कांदे स्वच्छ करून व धुवून घ्यावे. त्याचे देठ कापून टाकावे. चिरताना कांद्याचा भाग वेगळा व पातीचा भाग वेगळा चिरून ठेवावा. एका कढईत तेल तापवुन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. आता आले लसुण पेस्ट टाकावी. थोडी लालसर झाली की कांद्याचा भाग टाकून परतून घ्यावा. आता हळद, तिखट, धणेपूड टाकून चिरलेली  पात टाकावी. झाकण ठेवून ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. मग झाकण काढून मीठ टाकून ढवळून घ्यावे. बेसन टाकून एकत्र करावे व परत झाकण ठेवून 3 मिनिटे मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी. 


Comments