दोडक्याच्या सालांची चटणी ( ridge gourd skin chutney)

साहित्य - 

१. दोडकी ३

२. तीळ अर्धी वाटी 

३. हिरव्या मिरच्या ४ 

४. तेल ३ चमचे 

५. मोहरी पाव चमचा 

६. जिरे पाव चमचा

७. मीठ चवीनुसार 


कृती - 

दोडकी स्वच्छ धुवून कोरडी करून घेणे. त्याची किसणीने वरची साले किसून घेणे. एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू देणे. आता त्यात मिरची बारीक चिरून टाकणे. दोडक्याची किसलेली साले व तीळ टाकून चांगले १० -१२ मिनिटे मंद आचेवर परतून घेणे. तिळाचा रंग बदलला व दोडक्याची साले थोडी कुरकुरीत झाली की मीठ टाकून एकत्र करणे. गॅस बंद करून थंड झाल्यावर चटणी डब्यात भरून ठेवणे.

Comments