सोया चंक्स मसाला रस्सा ( soya chunks masala gravy)

साहित्य -

१. सोया चंक्स छोटे २ वाटी

२. कांदा १

३. सुक्या खोबऱ्याचे तुकडे अर्धी वाटी

४. लसूण पाकळ्या ५

५. आले एक छोटा तुकडा 

६. तीळ २ चमचे

७. गरम मसाला दीड चमचा

८. लाल तिखट आवडीनुसार

९. मीठ चवीनुसार

१०. तेल ४-५ चमचे

११. धनेपूड १ चमचा

१२. जिरेपूड अर्धा चमचा

१३. कोथिंबीर अर्धी वाटी

१४. हळद पाव चमचा


कृती - 

एका भांड्यात भरपूर पाणी घेऊन त्यात सोया चंक्स ७-८ मिनिटे उकळून घेणे. थंड झाल्यावर पाणी काढून टाकणे. आता २ वेळा थंड पाण्याने धुवून पिळून सर्व पाणी काढून टाकणे. तव्यावर अर्धा चमचा तेलात खोबऱ्याचे तुकडे, तीळ व चिरलेला कांदा वेगवेगळा छान काळपट भाजून घेणे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, खोबरे, लसूण, आले घेऊन आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेणे. एका भांड्यात तेल तापवून त्यात पेस्ट टाकून मिडियम आचेवर ५-१० मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घेणे. आता गरम मसाला, तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड टाकून अजून २ मिनिटे परतणे. रस्सा जितपत पातळ हवा तेवढं पाणी टाकून उकळू देणे. उकळी आल्यावर गॅस मंद करून सोया चंक्स, मीठ टाकून १० मिनिटे शिजू देणे. गॅस बंद करून कोथिंबीर टाकणे. व गरम भाजी सर्व्ह करणे.

Comments