पालकाच्या पुऱ्या ( spinach puri)

साहित्य

१. पालक अर्धी जुडी 

२. आल्याचा एक तुकडा 

३. मिरच्या ५-६ 

४. मीठ चवीनुसार 

५. जिरेपूड १ चमचा 

६. तेल तळण्यासाठी 

७. कणिक साधारण ४-५ वाटी 

८. तीळ पाव वाटी

९. कोथिंबीर अर्धी वाटी 

१०. रवा अर्धी वाटी


कृती - 

पालकाची पाने धुवून पाणी निथळून घ्यावे. एका मिक्सरच्या भांड्यात पालक, आले, मिरच्या हे सर्व पाणी न टाकता बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात ३ चमचे तेल, जिरेपूड, मीठ, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एकत्र करावे. आता या मिश्रणात मावेल तेवढी कणिक व रवा टाकावा. पाणी टाकू नये. घट्ट गोळा मळून घ्यावा. १५ मिनिटे झाकून ठेवावा. आता एका कढईत तेल तापवून त्यात थोड्या जाडसर पुऱ्या लाटून तळाव्या. गरमच सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह कराव्या.

Comments