अंडा करी ( Egg curry )

साहित्य - 

१. अंडी ६ 

२. कांदा १ 

३. सुके खोबरे अर्धी वाटी चिरलेले 

४. लसूण पाकळ्या ५-६ 

५. आले एक छोटा तुकडा

६. काजू ३ 

७. तमालपत्र २ 

८. बडी वेलची अर्धी 

९. मसाल्याचे फुल अर्धे

१०. दगडफुल अर्धा चमचा 

११. शहाजीरे अर्धा चमचा 

१२. जावित्री अर्धा चमचा 

१३. मिरे ४ 

१४. लवंग ३ 

१५. तेल आवश्यकतेनुसार 

१६. मीठ चवीनुसार 

१७. गरम मसाला अर्धा चमचा

१८. लाल तिखट आवडीनुसार

१९. हळद अर्धा चमचा 

२०. धणे २ चमचे

२१. हिरवी वेलची २ 

२२. दालचिनी एक छोटा तुकडा 

२३. कोथिंबीर अर्धी वाटी 


कृती - 

प्रथम अंडी उकडून घेणे. तव्यावर एक चमचा तेल टाकून चिरलेला कांदा काळसर होईपर्यंत भाजून घेणे. त्याच प्रकारे खोबरे भाजून घेणे. आता गरम तव्यावर बाकीचा सगळा मसाला १ मिनिटांकरता चांगला भाजणे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात भाजलेला खडा मसाला व खोबरे टाकून बारीक पावडर करून घेणे. आता त्यातच भाजलेला कांदा, आले, लसूण, काजू टाकून वाटून घेणे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेणे. एका पॅन मध्ये ४ चमचे तेल तापवून त्यात उकडलेली अख्खी अंडी सोडणे. सर्व बाजूंनी थोडी लालसर होईपर्यंत परतून काढून घेणे. त्याच पॅन मध्ये आता वाटलेला मसाला ५-६ मिनिटांकरता मिडीयम आचेवर परतून घेणे. त्यात तिखट, गरम मसाला, हळद टाकून १ मिनिट होऊ देणे. आता आवश्यकतेनुसार पातळ करण्याकरता पाणी टाकून उकळी येऊ देणे. मीठ टाकून एकत्र करून गॅस बंद करावा. कोथिंबीर व तळलेली अंडी टाकून सर्व्ह करावे.

Comments