कांदा बटाट्याचा पराठा ( onion potato paratha)

साहित्य - 

१. बटाटे ४ 

२. कांदे २

३. आमचूर पावडर १ चमचा 

४. कणिक ४ वाटी 

५. मीठ आवश्यकतेनुसार 

६. जिरेपूड १ चमचा 

७. धणेपूड १ चमचा 

८. कलौंजी २ चमचे 

९. मिरच्या ६-७

१०. लसुण पाकळ्या ६-७ 

११. तेल आवश्यकतेनुसार 

कृती - 

कणकेमध्ये मीठ, कलौंजी व २ चमचे तेल टाकून पाण्याने सैलसर मळून अर्धा तास झाकून ठेवणे. बटाटे कुकरमध्ये चांगले शिजवून घेणे. थंड झाले की हाताने व्यवस्थित स्मॅश करून घेणे. त्यात पाणी राहता कामा नये. मिरची व लसूण मिक्सरला वाटून बटाट्यात टाकणे. आमचूर पावडर, जिरेपूड, धणेपूड, मीठ, बारीक  चिरलेला कांदा टाकून एकत्र करणे. आता कणकेचा मोठा गोळा हातावर घेऊन त्याची वाटी बनवून त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा मोठा गोळा भरून चारही बाजूंनी बंद करणे. आता गव्हाच्या पिठात घोळवून जाड पराठा अलगद लाटून घेणे. तव्यावर दोन्ही बाजूनी एक एक चमचा तेल सोडून खरपूस शेकून घेणे. वरून बटर टाकून गरमागरम दह्याबरोबर सर्व्ह करणे.

टीप- 

बटाट्याच्या मिश्रणात कांद्याबरोबर मीठ असल्यामुळे मिश्रणाला पाणी सुटून पराठा लाटताना फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर मिश्रण झाल्याबरोबर पराठा बनवायला घ्यावा. किंवा जर पाणी सुटले तर मिश्रण फ्रिजमध्ये ठेवावे. त्याने मिश्रण थोडे घट्ट होईल.

Comments