तिळाची मिरची ( chilli sesame chutney)

साहित्य - 

१. मिरच्या १०

२. तीळ अर्धी वाटी

३. हळद पाव चमचा 

४. मीठ चवीनुसार

५. लिंबू १

६. तेल २ चमचे 

७. मोहरी पाव चमचा

८. कढीपत्त्याची पाने १०


कृती - 

मिरच्या धुवून बारीक चिरून घ्याव्या. एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी तडतडू द्यावी. हळद, मिरच्या, कढीपत्ता टाकून २ मिनिटे मंद गॅसवर परतून घ्यावे. आता तिळ, मीठ टाकून ३-४ मिनिटे परतावे. तिळाचा रंग थोडा ब्राऊन झाला की लिंबाचा रस टाकून अर्धा मिनिट परतून गॅस बंद करावा. ही तिळाची मिरची भाकरीबरोबर तोंडी लावायला द्यावी. 

Comments