शेवग्याचा शेंगांचा मसाला ( drumstick masala)

साहित्य - 

१. शेवग्याच्या शेंगा 4

२. कांदे ४

३.टोमॅटो २

४. आल्याचा एक तुकडा 

५. लसूण पाकळ्या ५

६. लाल तिखट चवीनुसार

७. गरम मसाला दीड चमचा

८. तेल ३ चमचे 

९. मोहरी अर्धा चमचा

१०. जिरे अर्धा चमचा

११. हळद पाव चमचा

१२. मीठ चवीनुसार

१३. कढीपत्त्याची पाने ६-७

१४. कोथिंबीर अर्धी वाटी

१५. धणेपूड २ चमचे

 

कृती - 

शेवग्याच्या शेंगांची साले चाकूच्या साहाय्याने काढून घेणे. त्याचे तुकडे करून घेणे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणे. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडू देणे. आता त्यात कढीपत्ता, कांदा टाकून चांगले परतवून घेणे. कांदा परतल्यावर त्यात आले लसूण कुटून टाकणे. चांगले रंग बदलेपर्यंत परतणे. आता टोमॅटो टाकून परतून घेणे. टोमॅटो नरम झाल्यावर भांड्यातच स्मॅश करून घेणे. आता तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड टाकून ३-४ मिनिटे परतणे. आता शेंगा, मीठ टाकून २ मिनिटांनी ३ कप पाणी टाकणे. झाकण ठेवून मिडियम आचेवर शिजू देणे. शेंगा पूर्ण शिजल्यावर पाणी आटू देणे. रस्सा हवा असल्यास जास्त पाणी टाकणे. मग गॅस बंद करून कोथिंबीर टाकणे. गरम सर्व्ह करणे.

Comments