ऑईस्टर मशरूम सूप / oyster mushroom soup




साहित्य - 

१. ऑईस्टर मशरूम २ वाटी
२. कांदा १
३. गाजर १
४. नूडल्स अर्धी वाटी
५. शिमला मिरची एक छोटी
६. लसूण पाकळ्या ७-८
७. आले एक छोटा तुकडा
८. रेड कॅबेज एक वाटी
९. मिरपूड १ चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. ऑलिव्ह ऑईल ४ चमचे
१२. ब्रोकोली अर्धी वाटी 

कृती - 

मशरूम्स स्वच्छ धुवून घेणे. अर्धे कापून ठेवणे. सर्व भाज्या धुवून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून ठेवणे. एका भांड्यात एक चमचा तेल गरम करून त्यात मशरूम्स एक मिनिट फ्राय करून काढून घेणे. त्याच भांड्यात अजून ३ चमचे तेल टाकून आले, लसूणचे बारीक काप टाकून चिरलेला कांदा टाकून चांगले फ्राय करून घेणे. आता त्यात मशरूम्स वगळून वरील सर्व भाज्या टाकून ३ मिनिटे झाकण ठेऊन शिजवून घेणे. आता त्यात ३ ग्लास पाणी टाकून नूडल्स टाकून शिजेपर्यंत उकळून घेणे. शेवटी मिरपूड, मीठ व मशरूम्स टाकून २ मिनिटे उकळू देणे. गरम सर्व्ह करणे.

Comments