उपवासाचा डोसा / fasting dosa




साहित्य –

१. साबुदाणा १ वाटी
२. वरीचे तांदूळ १ वाटी
३. मीठ चवीनुसार
४. तेल आवश्यकतेनुसार 

कृती –

साबुदाणा व वरीचे तांदूळ रात्री भरपूर पाण्यात भिजत घालावे. सकाळी पाणी काढून टाकावे. मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. बारीक करतांना आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. वाटून झाल्यावर त्यात अजून पाणी टाकून मिश्रण पातळ करून घ्यावे. त्यात मीठ टाकावे. नॉनस्टीक तव्यावर एक चमचा तेल सोडून पसरवून घ्यावे. तापल्यावर थोडे पाणी शिंपडावे व डोसा पसरवावा. शिजल्यावर गरमच नारळाच्या चटणीबरोबर वाढवा.

Comments