झुकीनी पॅटीस / zucchini patties




साहित्य -

१. झुकीनी २
२. कांदा १
३. कोथिंबीर अर्धी वाटी
४. मैदा अर्धी वाटी
५. कॉर्नफ्लोअर ३ चमचे
६. मीठ चवीनुसार
७. मिरपूड अर्धा चमचा
८. मिरच्या ४
९. तेल आवश्यकतेनुसार 

कृती - 

झुकीनी जाड किसणीने किसून सर्व पाणी दाबून काढून टाकावे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या टाकाव्या. मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरपूड टाकून मिक्स करणे. एका गरम तव्यावर ३ चमचे तेल सोडावे. पोळीच्या गोळ्याएवढा गोळा घेऊन तव्यावर थापावा. २-३ मिनिटे मिडीयम आचेवर खरपूस शिजवून घ्यावे. अश्याप्रकारे दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यावे. सॉस बरोबर सर्व्ह करावे.

Comments