डोसा इंस्टंट रेडी मिक्स / dosa instant ready mix




साहित्य -  

१. उडद डाळ एक वाटी
२. हरबरा डाळ अर्धी वाटी
३. तुरडाळ अर्धी वाटी
४. मेथी दाणा एक चमचा
५. तांदूळ पीठ ३ वाट्या
६. रवा अर्धी वाटी
७. पिठीसाखर एक चमचा
८. मीठ चवीनुसार
९. सोडा एक चमचा 

कृती - 

उडद डाळ, हरबरा डाळ, तुरडाळ, मेथी दाणे एकत्र एका भांड्यात गरम होईपर्यंत gas वर ठेवावे. थंड करून मिक्सर मध्ये बारीक पूड करून घेणे. एका भांड्यात तांदूळ पीठ व रवा एकत्र थोडा गरम करून घ्यावा. आता वरील सर्व साहित्य एकत्र करून कालवून हवाबंद डब्यात ठेऊन द्यावे.

Comments