ब्रोकोली उपमा / broccoli upama




साहित्य –

१. ब्रोकोली एक वाटी
२. रवा २ वाटी
३. कांदे २
४. मिरच्या ५
५. मीठ चवीनुसार
६. साखर पाव चमचा
७. मोहरी पाव चमचा
८. जिरे पाव चमचा
९. कढीपत्ता ७-८ पाने
१०. तेल ३ चमचे
११. कोथिंबीर अर्धी वाटी 

कृती –

एका कढईत रवा भाजून बाजूला ठेवावा. कढईत तेल तापवून मोहरी, जिरे तडतडू द्यावे. त्यात कढीपत्ता, मिरच्या व कांदे चिरून टाकावे. ब्रोकोली धुवून मिक्सरमध्ये वाटून त्यात टाकावी. २ मिनिटे शिजू द्यावे. शिजल्यावर २ ग्लास पाणी टाकावे. साखर, मीठ टाकावे. रवा टाकून मिक्स करणे. ३ मिनिटे शिजू द्यावे. सर्व्ह करतांना कोथिंबीर पेरावी.

Comments