बीटरूट सलाद / beetroot salad




साहित्य –

१. बीट २
२. कांदा एक
३. मिरच्या ३
४. नारळाचा चव
५. भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी
६. कढीपत्ता ७-८ पाने
७. कोथिंबीर अर्धी वाटी
८. तेल ३ चमचे
९. तीळ पाव वाटी
१०. चाट मसाला अर्धा चमचा
११. लिंबू एक
१२. मीठ चवीनुसार 

कृती –

एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात साल काढलेले शेंगदाणे, कढीपत्ता, चिरलेल्या मिरच्या व कांदा टाकून शिजवून घ्यावा. बीटची साले काढून जाड किसणीने किसून त्यात टाकावे. २ मिनिटे शिजू द्यावे. मीठ, चाट मसाला, तीळ, कोथिंबीर, नारळाचा चव, लिंबाचा रस टाकून gas बंद करावा व सर्व्ह करावे.

Comments