स्ट्रोबेरी पाय / strawberry pie




साहित्य-
१. स्ट्रोबेरी १ वाटी
२. मैदा १ वाटी
३. बटर अर्धी वाटी
४. साखर ४ चमचे
५. थंड पाणी आवश्यकतेनुसार
६. स्ट्रोबेरी फ्लेवर जिलेटीन पावडर १ चमचा
७. कॉर्नफ्लोअर अर्धा चमचा
८. लोणी अर्धा पाव
९. साखरेची पूड ३ चमचे 

कृती-
एका भांड्यात मैदा, १ चमचा साखरेची पूड, बटर चे छोटे छोटे तुकडे टाकून हाताने चांगले कालवून घेणे. आता आवश्यकतेनुसार थंड पाण्याने घट्ट भिजवणे. एका प्लास्टिकमध्ये ठेवून १ तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणे. एका पातेल्यात साखर, कॉर्नफ्लोअर, जिलेटीन पावडर १ वाटी पाण्यात मिक्स करून गरम करायला gas वर ठेवणे. उकळी येईपर्यंत ढवळत राहणे. जास्त घट्ट होत असल्यात थोडे पाणी टाकणे. आता त्यात स्ट्रोबेरीचे छोटे तुकडे करून टाकणे. व gas बंद करणे. मिश्रण थंड होऊ देणे. आता फ्रीज मधील मैद्याचा गोळा काढून घेणे. त्याला परत थोडेसे मळून घेणे. त्याच्या छोट्या पुऱ्या लाटणे. आता वाटीच्या आकाराचे सिलिकॉन मोल्ड घेऊन त्यात व्यवस्थित ती पुरी ठेवणे. व आतील बाजूने दाबून सगळीकडे पसरवून घेणे. आता ह्या वाट्या मिक्रोवेव+ग्रील वर ६-७ मिनिटांकरिता ४००w वर ओव्हन मध्ये ठेवणे. वरून ब्राऊन होत आल्या की काढून घेणे. आता वाट्या थंड होऊ देणे. मग स्ट्रोबेरीचे मिश्रण त्यात ओतणे व फ्रीज मध्ये थंड होऊ देणे. क्रीम बनवण्याकरिता एका कटोऱ्यात लोणी घेऊन  २ चमचे साखर टाकणे. काटोऱ्याच्या खाली बर्फाची लादी ठेऊन बिटर ने हलके होईपर्यंत फेटणे. बिटर नसेल तर हाताने फेटणे. आता हे क्रीम पायपिंग bag मध्ये भरून स्ट्रोबेरी पायच्या वर लावणे. थंड सर्व्ह करणे.
टीप-
मोठ्या प्रमाणात करायचे असल्यास छोट्या सिलिकॉन मोल्ड मध्ये न करता मोठ्या काचेच्या मिक्रोवेव प्रूफ गोल थाळीत करता येते.    

Comments