मेथी मटार मलाई / methi matar malai




साहित्य-
१. मेथी १ जुडी
२. मटार दीड वाटी
३. आले लसूण पेस्ट १ चमचा
४. कांदे २
५. तेल ३ चमचे
६. फ्रेश क्रीम १०० मि.ली
७. ओवा पाव चमचा
८. मोहरी पाव चमचा
९. जिरे पाव चमचा
१०. तिखट अर्धा चमचा
११. मीठ आवश्यकतेनुसार
१२. हळद पाव चमचा 

कृती-
प्रथम मेथी धून चिरून घेणे. एका पातेल्यात अर्ध पाणी घेऊन त्यात मेथी टाकून १० मिनिटे उकळून घेणे. सर्व पाणी निथळून घेणे. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे तडतडू देणे. मग त्यात चिरलेला कांदा परतवून घेणे. आले लसूण पेस्ट, मटार, हळद, ओवा टाकून २ मिनिटे शिजू देणे. मग तिखट टाकून मेथी व मीठ टाकणे. आता झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवून घेणे. आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी टाकणे. मग फ्रेश क्रीम टाकून gas बंद करून गरम गरम सर्व्ह करणे.

Comments