चिली मसाला चिकन / chilli masala chicken




साहित्य –
१. बोनलेस चिकन ६५० ग्रॅम
२. टमाटे २
३. लसूण पाकळ्या ५
४. आले एक छोटा तुकडा
५. हिरव्या मिरच्या ६ 
६. लाल सुक्या मिरच्या ४
७. मीठ चवीनुसार
८. तिखट आवश्यकतेनुसार
९. काळी मिरी ५
१०. धने पावडर अर्धा चमचा
११. जिरे पावडर अर्धा चमचा
१२. जिरे अर्धा चमचा
१३. कांदे २ मोठे
१४. तमालपत्र ३
१५. हळद पाव चमचा
१६. गरम मसाला पाव चमचा
१७. साखर अर्धा चमचा
१८. तेल ५ चमचे
१९. कोथिंबीर अर्धी वाटी

कृती –
प्रथम चिकन धून त्याला हळद व मीठ लावून १ तास मुरु द्यावे. मग एका मिक्सरच्या भांड्यात टमाटे, लसूण, आले, हिरव्या मिरच्या ४, सुक्या मिरच्या, मीठ, तिखट, काळी मिरी, धने पावडर, जिरे पावडर, हळद, गरम मसाला, साखर टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. आता एका पातेल्यात तेल गरम करून जिरे, उभ्या चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या, तमालपत्र टाकून चिरलेला कांदा परतवून घ्यावा. आता तयार पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. मग चिकन टाकून झाकण ठेऊन शिजू द्यावे. चिकन शिजल्यावर झाकण काढून कोरडे होऊ द्यावे. मग चिरलेली कोथिंबीर टाकून तंदुरी रोटी बरोबर गरम सर्व्ह करावे.  

Comments